अजून मदत हवी आहे का?
फॅक वाचून पाहा.
आपल्या प्रश्नाचे उत्तर सापडले नाही तर आमच्याशी संपर्क साधण्यास संकोच करू नका.
महत्त्वाची पाने
- How to be a good contributor in Tatoeba, by Trang
- Tatoeba.org: What You Can Do and How to Do It, by CK
- Submission policies - What kind of content do we want?, by Trang
- Moderators in Tatoeba, by Trang
- Warning: you are being disrespectful, by Trang
नवीन वाक्ये जोडणे
नवीन वाक्ये जोडण्याचे दोन मार्ग आहेत.
- प्रत्येक पानाच्या शीर्षस्थानी असलेल्या योगदान करा या मेन्यूमधून वाक्ये जोडा हा पर्याय निवडा.
- नवीन यादी बनवून त्या यादीच्या संपादन पानाडे जाऊन.
तातोएबावर भरपूर वाक्ये असली तरी अशी पुष्कळ शब्द आहेत ज्यांच्यासाठी वाक्य अस्तित्वात नाहीत. म्हणूनच आम्ही तुम्हाला नवीन शब्द असलेली वाक्ये जोडण्यास उत्तेजित करतो. अश्या वाक्यांची आपल्याला कोणत्याही भाषेत भाषांतर करता येत नसतील, तरीही काही हरकत नाही.
वाक्यांचे भाषांतर करणे
वेगवेगळ्या भाषांत भाषांतर केलेली वाक्ये गोळा करणे हा तातोएबाचा एक मुख्य हेतू आहे. म्हणूनच भाषांतर करणे हा तातोएबामधील सर्वात महत्त्वाच्या क्रियांमधील एक आहे.
एखाद्या वाक्याचं भाषांतर जवळजवळ कुठूनही केलं जाऊ शकतं. हा प्रतीक दिसल्यावर त्यावर सहजपणे क्लिक करा:
चुका दुरुस्त करणे
वाक्यांतील चुका दुरुस्त करण्यासाठी ती वाक्ये आपल्या मालकीची असायला हवी. इतर कोणाच्याही वाक्यात चूक आढळल्यास त्या वाक्यावर टिप्पणी पोस्ट करून आपण त्या प्रयोक्त्याला चूक कळवू शकता.
काही विशिष्ट प्रकरणांत वाक्याचा मालक नसतो. याबद्दल अजून माहितीसाठी, (दत्तक घेण्याविषयीचा) खालील परिच्छेद वाचा.
वाक्ये दत्तक घेणे
आपण जेव्हा वाक्य जोडा तेव्हा ते वाक्य आपल्या मालकीचे होते - अर्थात केवळ आपणच ते वाक्य संपादित करू शकता. परंतु, तातोएबातील पुष्कळ वाक्ये तानाका कॉर्पस नावाच्या एका जपानी-इंग्रजी लेखनसंभारातून प्राप्त केली गेली आहेत. तातोएबाच्या बाहेरून गोळा केल्या गेल्या असल्यामुळे, या वाक्यांचे कोणीही मालक नव्हे.
एखाद्या "अनाथ" वाक्यात चूक दिसली, तर आपण त्या वाक्याचे मालक नसल्यामुळे ती चूक आपल्याला दुरुस्त करता येणार नाही. यासाठीच "दत्तक घ्या" () हा पर्याय उपलब्ध आहे. वाक्य दत्तक घेतल्यावर आपण त्या वाक्याचे मालक बनाल व ते वाक्य संपादित करू शकाल.
वाक्ये दत्तक घेणे हादेखील "गुणवत्ता प्रक्रियेचा" एक भाग आहे. आपल्याला याविषयी अधिक माहिती येथे सापडेल: http://blog.tatoeba.org/2009/01/new-validation-system.html
वाक्यांच्या याद्या
तातोएबावर आपण वाक्यांच्या याद्या बनवू शकता. सुरुवातीला ही यादी व्यक्तिगत असते. अर्थात, ज्या व्यक्तीने यादी बनवली आहे, तीच व्यक्ती त्या यादीला संपादित करू शकते (परंतु तरीही ती यादी सर्वांनाच दिसून येईल).
परंतु, एखादी यादी सहयोगी म्हणून सेट केल्याने तातोएबामधील कोणत्याही सदस्याला त्यात वाक्ये जोडायला वा काढून टाकायला परवानगी देणे असे ही शक्य आहे.